Thursday, November 25, 2010

पहिले पावूल

इथे आल्यापासून खूपच वाढलंय classical ऐकणे ..
काही खास कारण नाही पण वाढलंय हे खरे ..
आणि मग सरसरून आठवण येते मामाची ..
आज हा माझा पहिला वहिला प्रयत्न माझ्या लाडक्या मामाला अर्पण ...

माणूस दुर गेला कि काही काही गोष्टी फारच प्रकर्षाने आठवतात जाणवतात...
मामाचे बोलणे त्याचे मधेच अचानक फोन करणे आणि मग गडबडीत phone ठेऊन देणे..
मग मी विचारायचे 'boss ने बरा phone करू दिला रे तुला ' तर म्हणायचा 'बसू दे त्याला बोंबलत, तू बोल '...
त्याचे सगळे असाच असायचे घाई घाईत गडबडीत पण एकदम perfect
बऱ्याच गोष्टी त्याला एकाच वेळी करायच्या असायच्या आणि तो ते manage हि करायचा ..
अचानक त्याला वाटले mp3 बनवूयात भैरवी च्या ..
झाले .. भराभर त्याने software शिकून घेतलेन.. प्रत्येक CD
साठी कवर तयार केलन .. CDs तयार .. दिल्या पाठवून आपल्या मित्र मंडळींना ...
हाच उत्साह त्याच्यात संचारला होता जेव्हा त्याने कोकणात ट्रिप्स न्यायला सुरुवात केली..
प्रत्येक जागा, हॉटेल्स, स्वतः पारखून घेऊनच तो पुढे गेला .. 
अगदी traveling कीट तयार करणे .. contacts तयार करणे .. 
अशा अनेक बारीक सारीक गोष्टी त्याने इतक्या सहज पेलल्या..
काही तरी नवीन करावे म्हणतोय.. चला आता प्रत्येक ट्रीप ला एखादा कलाकार नेऊ आणि निसर्ग सान्निध्यात एक सांगीतिक संध्याकाळ साजरी करू ..
अफाट गाजली हि त्याची आयडिया ...
सुरेख नियोजन, मामीची परफेक्ट साथ आणि त्याचा प्रचंड उत्साह .. झकास जमून आले सगळे..
मी हि जायचे कधी कधी उगाचच लुडबुड म्हणून आणि मज्जा करून यायचे..
मामाच्या गावाला जायची मजा मी नि श्रुती ने  पुरेपूर अनुभवली ..
सगळे हट्ट लाड हक्काने मामा मामी कडून पुरवून घेतले..

त्याच्या या अफाट आणि फास्ट जगण्यात कधी त्याच्या सामाजिक जाणीवेची मला कल्पना नव्हती ..
पण 'देणे समाजाचे ' च्या concept बद्दल त्याचा कडूनच ऐकले आणि वेड लागले मला..
सामाजिक संस्था चे प्रदर्शन .. हल्ली पैसा असला तरी तो कसा नि कुठे सत्कारणी लावावा, कुठल्या संस्थे पर्यंत पोचवावा हा प्रश्नच त्याने सोडवायचे ठरवले..
सगळ्यात आधी त्याने प्रत्येक सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांची .. त्यांच्या कामाची .. खातरजमा करून घेतली आणि पुण्यातल्या एका नावाजलेल्या सभागृहात दिवसांचे प्रदर्शन बनवले.
व्यवस्थित नियोजन बद्ध publicity
 केली आणि पुणेकरांच्या अप्रतिम प्रतिसादामुळे अतिशय यशस्वी करून दाखवले ते प्रदर्शन ..
यंदा चे हे तिसरे वर्ष.. फरक एवढाच .. प्रदर्शन तेवढाच यशस्वी झाले पण वजा माझा मामा ..

पूर्वी वरचे वर भरून येणारे दुक्ख हल्ली कमी झालाय हे खरे मामा ..
पण अजूनही 'भय इथले संपत नाही ..' हे गाणे त्रयस्थ पणे ऐकण्याची हिम्मत नाही आली अजून माझ्यात..
तुझ्या जाण्याने तयार झालेली हि पोकळी इतकी गहिरी आहे कि त्यात नुसते डोकावून बघताना सुद्धा सरसरून काटा येतो अंगावर..

नीट आठवून बघितल्यावर आठवते, मला बाईक वर बसायला तूच शिकवला होतेस आणि मी पहिल्यांदा जेव्हा drive केले तेव्हा सुद्धा तू सगळ्यात खुश झाला होतास..
तू केलेली मजा मस्करी.. भीमसेन जोशींची नक्कल .. रात्री झोपताना  शोले चे dialogs म्हणून थोपटणे .. सगळे सगळे लक्षात आहे रे..
अगदी तुझे 'च्या मारी ' म्हणणे सुद्धा..

बघता बघता वर्ष लोटली आणि तरी हि इतक्यांदा ठरवूनही आज पर्यंत हे आणि असे अनेक विचार नाही जमले असे एकत्र करायला ... आता हि सगळे तुटक तुटकच वाटतय जे काही लिहिलंय ते..
असो ..
सगळ असं घडलेले आणि घडवत गेलेले असं काही नाही लिहिता येणार ..
तेवढी प्रतिभा नाहीच माझ्या अंगी ..

सतत productive विचार करणारा .. दुसऱ्यांसाठी सतत झटणारा तू जेव्हा मला आठवतोस तेव्हा खरेच अपोआप आत्मपरीक्षण केले जाते माझ्या कडून   (कुठे मी स्वतःच्याच घेतलेल्या निर्णयांवर अधे मध्ये चद्फ्द्णारी!)

शाळेत लिहिलेले निबंध सोडल्यास इतक्या वर्षात मला कधीही असे हे विचार लिहिणे नाही जमले ..
आज जेव्हा वाटते कि मामाकडून खूप काही शिकण्यासारखे होते जे राहूनच गेले..
कदाचित मामासारखे बिनधास्त होण्याच्या दिशेने असावे हे पहिले पावूल ..
- 
Regards,
Sneha